Search This Blog

Tuesday 24 April 2018

रावेतील आठवण

दमी rawe साठी म्हौप्रे तालूका कऱ्हाड जिल्हा सातारा येथे होतो येथील खूप काही अविस्मरणीय आठवणी आहेत त्यातील एक एके दिवशी मी आणि माझा मित्र हेमंत कुलकर्णी आम्ही दोघे शेजारीच सूपने या गावी आमच्या अनुपम देसाई यामीत्राच्या दाजीच्या घरी आमंत्रण होते त्या निमित्त आम्ही दोघं मस्त कपडे घालून इन बीन करून बूट घालून निघालो मला वाटते अंदाजे 6/7की .मी .अंतर असेल एसटी ने आम्ही स्टॉप ला उतार्लॉ  हातात पत्त्यांची चिटोरि पत्ता विचारत विचारत घराच्या दिशेने निघालो घराची दर्शनी बाजू मागील बाजूस होती दरवाजा दिसला कोणीतरी पढवित उभे होते शेजारीच म्हशीचा घोटा होता खूप पाऊस पडून गेला होता रस्ता कळत नव्हता आजुबजुला पाला पाचोळा होता हेमंत ने चिटुरि काढली घराच्या दिशेने आवाज दिला ' अहो  राजू पाटील येथेच राहातात का ?  हेमंत माज्या पुढे होता पाहता पहाता त्याचे फक्त तोंड दिसत होते खांद्या खालील भाग शेणाच्या खड्ड्यात  खूप घाबरलो प्रसंगावधान पाहून राजू पाटील दोरी घेऊन आले दोरीने त्याला बाहेर काढले हेमंत खूप टेन्शन मधे होता सर्व कपडे अंग शेणाने भरलेलं अशा अवस्तेत तो घरात जाईना मला म्हणाला आपन असेच पाय पाय म्हौप्रे स  जाऊ 6/7 किलो मी . शेवटी पाहुण्यांनी नळा खाली बसून तासभर अंघोळ घातली जेवन केले राजू पाटीलच् कपडे घातले हेमंतला शर्ट घुद्ग्यपर्यंत येत होता कंबरेला प्यांट सैल बसत होती कशीतरी कर्गोटा गुंडाळून प्यांट ताईत केली पिशवीत स्पोर्टस बूट  घातला अंधाराचा फायदा घेत आम्ही पुन्हा एसटी ने म्हौप्रे घाटले' परंतु काय सांगू rawe संपे पर्यंत अक्षरशः गोठ्यात आहे की काय असे वाटंत होते कमीत कमी 6महिने बुटाचा शेणाचा वास जात न्हवता

संजय दरेकर   के 86

Friday 20 April 2018

क्विजचा मामला

Tukaram B.Patil (TB) - K 85136:
😂🙏🏻क्विजचा मामला🙏🏻🤔🤭

बॅच-१९८५ ...अन् वर्ष दुसरे...

मी(तुकाराम) अन् राज्या कांबळे रूम नं.२१८ मध्ये रूम पार्टनर...
तसे आम्ही दोघं एकदम अ....शांत आणि अ....बोल स्वभावाचे..🤭😲
त्यामुळे आम्हा दोघांना जो ओळखत नसे तोच अनोळखी...🤔😂
आमच्या शेजारीच रूम नं.२१९ मध्ये  नंद(कुमार) भोईटे तथा "आप्पा" रहात होते.याच आप्पांचा राज्यावर शुन्य आणि माझ्यावर(तुका) १००% विश्वास...🤭🤔😂
एकदा त्याचं असं झालं की,आमचा राज्या आजारी पडला.त्याच्या सेवेला "आप्पा" हजर...👍
त्याच दरम्यान क्विजच्या परीक्षा सुरू होत्या. पण आमच्या राज्याची GPB ची क्वीच आजारपणामुळे बुडली अन् हे आप्पांना १००%खात्रीने माहिती हुतं...
   दुसऱ्या दिवशी त्याच GPB ची क्वीच माझी क्वीज होती.राज्याच्या बुडलेल्या क्वीजबाबत त्याची अन् माझी रात्री "महत्वपूर्ण"🤔 अशी चर्चा झाली...
GPB ला पाटील नावाचे शांत,संय्यमी स्वभावाचे सर होते.अन् त्याच शांत, संय्यमी स्वभावाचा बुडलेल्या क्वीजसाठी फायदा उठवायचा हे आम्ही ठरवलं...👍🤝
पण हे शांत गुपित फकस्त दोघापुरतंच अबाधित ठेवलं.अगदी आजारी राज्याच्या शेजारी असणाऱ्या "आप्पांना" सुध्दा हे माहिती झालं नाही...😉
मी माझ्या क्वीजला गेलो.सरांनी प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा पहिल्या बाकावर दिला अन् म्हणाले एक घ्या आणि गठ्ठा मागे द्या...
मी एक ऐवजी दोन प्रश्न पत्रिका घेतल्या. एकावर माझा आणि दुसऱ्यावर राज्याचा रजिस्ट्रेशन नंबर लिहीला. पेपर बऱ्यापैकी सोप्पा असल्याने फटाफट सोडविला अन् वेळ संपताच मी स्वतः मागील व पुढील मित्रांचे पेपर गोळा करून त्यात माझे दोन पेपर घुसडून एकत्रित जमा केले...😉
किमयागारांची किमयापार...
आनंदाला नाही पारावार..😂
पण ही किमया मी अक्कल ऐवजी अट्टल हुषारीने केलेने बिनबोभाट पार पडली...🤭
आणि एकदाचं होस्टेल गाठलं व मुळ क्वीजमाकाला झालेली कथा कथन केली.पण मेरी भी चुप अन् तेरी भी चुप..🤔🤭
पण पुढं असं झालं की,अति विश्वासू "आप्पांनी" जे राजाशेजारी बसून होते त्यांनी मला सांगितले की,राज्याभाऊंची GPB ची क्वीज बुडली. तर मी म्हणालो की राज्या आत्ताच क्वीज देऊन आलाय...पण आप्पांना १००% खात्री होती की राजाभाऊ खोली सोडून कुठेही गेला नाही अन् क्वीज देणं तर अशक्यच...🙅‍♂
आणि त्याच बाबतीत आप्पांनी आमच्यासंगं पैज लावली...
"पैज होती जिंकेल त्याला शामचा वडा"🍔
😋😉🤣😋
दोनचार दिवसात क्वीजचा निकाल लागला. पण घडलं अघटीतच...🤔🤔
कारण मला स्वतःला पडले १० पैकी ९ आणि राज्याला पडले १० पैकी १० मार्क...!
🤭😅😅
निकाल बघून आप्पांनी डोक्यावर हात मारून घेतला...🙆🏻‍♂🙆🏻‍♂
कारण...
"काहीही कारण नसताना आप्पा विनाकारण  पैज हारले होते..."🤣😂
आणि...
त्यानंतर आमच्या आप्पांची पक्की खात्री झाली की...
"मित्रांसाठी काय पण.."
करू शकतो...
👇🏽
"एक अँग्रीकाँस"...👍

आणि...
मग पैज म्हणून एक शामचा वडा सुरीने मधोमध कापून त्याचा अर्धा भाग जिंकलेल्या राज्याने व अर्धा भाग पैज हारलेल्या आप्पाने खाल्ला दुसरा वडा आर्धा तुकाने व राज्या आजारी आसल्यामुळे त्याला आर्धा...
असे तिघात दोन वडे खाल्ले...😋🍔🍔😂
यालाच तर लंगोटी यार आसं म्हणायच...👍
जय हो अँग्रीकाँस...
धन्यवाद...
🙏🏻💞🙏🏻
लेखक...
तुकाराम पाटील(टी.बी.)
के-८५१३६

Thursday 19 April 2018

फुलपंखी दिवस

फुलपंखी दिवस

लेखक : रेणुकादास कुलकर्णी (K-80)

      तेव्हा खरंच आपण सर्वार्थाने "धम्माल"आयुष्य जगलोय. आपल्या बॅचने जो सुवर्णकाळ अनुभवला, जी धम्माल केली, जी मैत्री जपली,टिकवली त्याची सर कशालाच नाही. त्याच "संजीवनीने" आजही मनाने आपण काॅलेजकुमारच आहोत आणि घट्ट मित्रही आहोत.

 कोल्हापूरने मलाही घडवले. माझ्याकडे तर आठवणींचे भांडारच आहे. अगदी पांडुच्या कँटिनच्या खमंग पदार्थांपासून पासून (आणि त्याच्या मामाच्या अर्ध्या खाकीचड्डीच्या खिश्यांपासून—सायकल आणि जाडजूड मिशांपर्यंत )लक्ष्मणच्या बनियनने न झाकल्या जाणार्‍या ढेरीपासून ते केरबाच्या प्रत्येक टेबलापर्यंतच्या फेरीपर्यंत (उचगांव) आणि बिडवेंच्या (राजारामपुरी) हाॅटेलपासून (ए वन हाॅटेल?) डोंबारवाड्यातील खमंग किस्से, इकाॅनामिक्सच्या साळवे सरांच्या "घड्याळ लपवून आणण्याच्या" ज्योक्सपासून "लिवाच्चं,वाचाच्चं,बोलाच्चं, त्येला एक्स्टेंशन म्हणाच्चं" असं सांगणार्‍या कांबळे (देशमुख) सरांबद्दल, "सखूची मारली, ठकूची मारली" असे "बुद्धिमान"ज्योक्स सांगून आणि "बुद्धिबळ" ही शिकवणारे, वातावरण "फ्रेंडली" करणारे सर्वार्थाने आदरणीय मराठेसर यांनी आपल्या कृषि महाविद्यालयातील सगळ्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या सगळ्या प्रांतांत आणि येणार्‍या आव्हानांत बुद्धि स्थिर ठेवून हिंमतीने, ज्ञानाने, समर्पणाने, एकजूटीने,हसतमुखाने आणि वेळ पडल्यास एकट्यानेही लढण्याची ताकद,धैर्य, खेळकरपणा, मिश्किलपणा आणि सुसंस्कृतपणाचाही धडा देणार्‍या आदरणीय गुरुवर्यांपर्यंत सगळ्यांच्या आठवणी काळजाच्या कुपीत सुरक्षित जपल्या आहेत. असे जवळपास सगळचे गुरुजन मला नेहमीच आठवतात. त्यांची निष्ठा, विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी, काळजी, अभिमान आणि कौतुक , आशीर्वाद यांच्या बळावरच आज आपण सर्वजण उभे आहोत.

 आदरणीय रा.भा. जाधवसर, पी.टी.पाटीलसर, एस.एस. पाटीलसर, देशपांडेसर, कौलगुडसर, यादवसर (बोचॅनिकल नेम फेम),पॅथाॅलाजीचे रुईकरसर,पाटीलसर, , जयसिंगराव पवारसर, खांबे सर,इंगळेसर, कर्णिक सर,  महांबरीसर, दोन्ही कुलकर्णी सर, महाले सर, घोळवेसर, जतकर सर (Vetarinary स्पेलिंग मध्ये "आय" घालण्याचा किस्सा), नायडूसर,भगतसर, नाटकातील हिरोच्या स्टेजवरील माझ्या एंट्रीआधी स्वत:चा "चष्मा" माझ्या डोळ्यांवर प्रेमाने लावून मला आशीर्वाद देऊन "अभिनयाची नवी दृष्टी" देऊन माझे जीवनच "आनंदाची सृष्टी" करणारे वंदनीय श्री आनंद जाधवसर या सर्व गुरुजनांबद्दल कितीही लिहिले तरीही कमीच आहे. होस्टेलची व्यवस्था पाहणारे श्री गवळीही मला आजही आठवतात. कांही सरांची नांवं राहिली असल्यास मला आठवण करुन द्या कृपया. "चिप्रीकर"सरांचीही "आठवण" आहेच. या सगळ्या गुरुजनांना  मन:पूर्वक वंदन.

पांडुच्या कँटिनला "चंदन" लावण्यापासून  होस्टेलला "पॅरासाईट्सचे" "नंदनवन" करणारे मित्रही तेवढेच प्रिय आहेत. "खोलीत अंधार करुन तोंडात माचिसच्या जळत्या काड्या ठेऊन नाचणारे आणि त्यांना अचानक  अंधारात "भूत" समजून ओरडत पळणारे, प्रसंगी घाबरवून रेक्टरसरांनाही पळवणारे, सरांकडे "काड्या" करणारे, होळी पेटवून "नंगानाच" करणारे, उघड अभ्यास करणारे, गुपचूप अभ्यास करणारे, "सर, प्लीज अर्धा मार्क द्या" म्हणणारे सगळे नमुने पाहिले आपल्या बॅचने. माझ्या तर बर्‍याच जणांचे रोल नंबर्स/गांवही लक्षात आहेत. अभंग k80001 अभंग , अरणीकर2, साहेबराव ,आगाव, आठरे5, 6 नंबर सुधीर, 10 नंबर टेन सर म्हणणारा मित्र बेग, 66 नंबर पहिलवान संभाजी बयाजी कदम नरखेड, संपत शिदू करांडे,शाळगांव, करचे, विनोदवीर मोहन कदम , कांचन,कानडे,कडस्कर, 78विलास, 81 मन्या,82नंदू,83प्रदीप,84 हलकट शिरोमणी रेणुकादास, 85 गरीब शांत अशोक कुपाडे, तिकुटे,लोणकर कलढोणे, अशी सगळी मित्रमंडळी आजही आठवतात. किरण आर्वे,सुधाकर,सतीश, सुपेकर. आपल्या मित्रांच्याही "टोळ्या" असायच्या. "इंगळे, होलमुखे, जाधव, अनील लांडगे (87?), बारागजे, जयवंत, संतोष, , सुधीर—श्रीकांत (एसट्या), अशी उदाहरणं. 

मित्रांमध्येही "गुरु"मंडळी होती. तन्मयतेनं शिकवणारे माझे मित्र व्यायामात आणि अभ्यासावरही "लांडग्याप्रमाणे" तुटून पडायचे. मला त्याचा नेहमीच अभिमान वाटायचा. केशव मलगुंडे, नालबंद, माया वाघमोडे, भगवान देशपांडे, सुश्रूत, समीर पटेल, ढोले, पिंपळे,गायकवाड,काळे,भुजबळ, नाना, गारुळे या मित्रांनीही माझं जीवन समृद्ध केलं. किरण आर्वे हा देखील मस्त मित्र. वेंकट मला बुद्धिबळात भारी पडायचा. ज्युनियर रोकडे पण खूप छान बुद्धिबळ खेळायचा. अभ्यास, नाटक,क्रिकेट,सिनेमा, व्यायाम,गप्पा,यामध्ये मी सगळ्यांमध्ये असल्यामुळे तसेच पहिले वर्ष राजारामपुरीत आणि दोन वर्षं होस्टेलला असल्यामुळे माझी 180 पैकी बहुतेक सगळ्यांशीच गट्टी होती. अरविंद,संजय पवार (काळ्या), शितोळे, तुषार,प्रमोद, पिंट्या, नृसिंह, भिंगार्डे,खाडे,बाळासाहेब, गावडे, मधु, गोलांदे (काका पुतणे), हे सगळे सगळे आठवतात. त्यांना माझी आठवण आहे की नाही माहित नाही. ही सुरुवात आहे आठवणींची पोतडी उघडायची. बाय द वे, काॅलेजला माझ्या वडिलांची आणि जीजीच्या वडिलांची पहिली भेट झाली. त्यावेळी मी बारावीनंतर फाॅर्म भरुन आजोळी गेलो होतो. तिथं एका मुलीच्या आकर्षणात (प्रेमात नाही) पडलो होतो. प्रकरण बाॅलिंग पर्यंतच होतं. पण मी फाॅर्मात आणि धुंदीत—तारेत होतो. माझा वेटिंगला 153 वा नंबर असल्याची तार मिळताच तातडीने पळत आलो. त्याआधी वडील कोल्हापूरला दोनदा येऊन काॅलेजमध्ये येऊन मुदत मागून गेले होते. माझ्या "गांंडमस्तीत" अॅडमीशन हुकले असते, पण वडीलांची धडपड आणि काॅलेजची "कृपा" म्हणून मी शिकू शकलो. त्यावेळी जीजी मामनची पहिली भेट झाली. त्याला हिंदी मराठी येत नव्हतं आणि माझं इंग्लिश मलाच कळत नव्हतं. पण, पोरीच्या सुवर्णमृगरुपी आकर्षक जाळ्यातून सुटून विद्यापीठाच्या भावी "सुवर्णपदक"विजेत्या जीजी मामनच्या सोबतीने काॅलेजात प्रवेश घेतला, हा माझ्या जीवनातला खरा सुवर्णक्षण. मनमोकळे लिहिले आहे. तेव्हाचे माझे कांही मित्र आता सभ्यतेचा मुखवटा लावून फिरत असतील तर त्यांनी हा लेख वाचून दुखवटा पाळायला हरकत नाही.

जाता जाता काही क्षण

जाता-जाता.... काही क्षण....

            कृषी महाविद्यालय कोल्हापूरला बी.एस्सी. ॲग्रीला असतानाची गोष्ट आहे.  पावसाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी मैदानावर आलेलो होतो. अंधार पडला होता. पाऊस पडून गेल्यामुळे धावपट्टीवर कुठेकुठे चिखलही झाला होता. अंधारामुळे पायाखालचे व्यवस्थित दिसत नसल्यामुळे धावपट्टीवरून धावणं तसं थोडं धोक्याचंच होतं. वाॅर्मअप झाला आणि धावण्यासाठी मी सुरुवात केली. लक्ष धावपट्टी कडेच होतं. वेगही  मंदच होता आणि दबकत दबकतच  धावणे सुरू होतं. पहिली फेरी अर्धी होत आली. मागून प्रकाशाचा झोत धावपट्टीवर पडला. खाली-वर वर-खाली होत राहिला. माझी पहिली फेरी पूर्ण झाली. दुसरीही, तिसरीही आणि शेवटी पाचवी ही. कोणीतरी माझ्या मागून चालत येणारे बॅटरीचा झोत पुढे मारत होतं. त्यामुळे मला धावपट्टी दिसत होती आणि मी बिनधास्तपणे एकेक करत पाच फेऱ्या पूर्ण केल्या. मनापासून मी त्या व्यक्तीला खूप धन्यवाद दिले. माणूस स्वतः तर चालत होताच पण त्याबरोबर मलाही धावण्यासाठी प्रकाश मदत करत होता. मला खूप छान वाटल.
             अंगातून स्रवणाऱ्या घामाच्या धारा शांत समाधानी मन एक वेगळीच अनुभुती व शिकवण देऊन गेल्या.  धावून  झाल्यावर मी चालत चालत फेरी सुरू केली. जी व्यक्ती मला प्रकाश दाखवत होती ती व्यक्ती मला ओलांडून पुढे गेली. माझ्या लक्षात एक गोष्ट आली. ती मुद्दाम पुढे उजेड दाखवत नव्हती. त्या व्यक्तीच्या हातात बॅटरी होती व चालताना हात वर-खाली होत होता. आणि त्यामुळे उजेड समोर दूरपर्यंत पडत होता. त्या व्यक्तीला याची कल्पनाही नसेल कदाचित. ती व्यक्ती स्वतःसाठीच जरी चालत असली तरी स्वतःच्या चालण्यासाठी तिने घेतलेल्या उजेडामुळे इतरांचेही चालणे सुसह्य व सहजशक्य झाले होते. मनाला खूप भारी वाटल. प्रत्येक माणूस असच आयुष्य जगला तर...... आपली वाट प्रकाशमय करत असताना इतरही काही जनांची वाट प्रकाशमय झाली तर..... किती छान ना! आणि तीही आपल्याला यत्किंचितही नुकसान न पोहोचवता. ज्यांच्या आयुष्यात आपण प्रकाश पसरवतो त्यांना किती आनंद वाटत असेल ना...! मग कधी कधी हे करत असताना आपल्या थोडे कष्ट सोसावे लागले तर काय फरक पडतो? जर त्याने एखाद्याच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश डोकावणार असेल आणि त्या  एखाद्याचं आयुष्य सुखमय करणार असेल तर.... मग ते कायमचे असो वा काही कालावधीसाठी.... नक्कीच काही फरक पडत नाही. आदर पडला तरी तो फारसा नाही... आणि एखाद्याला होणाऱ्या  फायद्या पुढे तर नक्कीच काही नाही.
               बी. एस्सी. शेवटच्या वर्षी आमच्या कृषी अभियांत्रिकी विभागाची सहल रत्नागिरी महाबळेश्वरला गेली होती. बरेच चढ-उताराचे, वळणावळणाचे, सोपे-कठीण सौंदर्याने नटलेले, रस्ते होते. एखाद्या वळणावर अचानक समोरूनही एखादी गाडी यायची. अगदी अचानक वळण असल्यामुळे  समोर येणारे वाहन दिसायचं नाही आणि मग एखादा जबरदस्त कट बसायचा. एकदम वेगात.... बसमधील झोपलेल्या मेंबर्सना काही प्रॉब्लेम नसायचा,  पण जागे असलेल्या मेंबर्स पैकी बऱ्याच जणांची झोप उडायची.
               12- 1 ची वेळ होती. गाडी वळणावळणाच्या रस्त्यावरून डोंगर उतरून खाली येत होती. काही-काही ठिकाणी एकदम तीव्र वळणं होती. चालकाचा त्याठिकाणी कस लागायचा. आमच्या गाडीचे चालक मात्र  एकदम भारी होते. कसाही रस्ता असो गाडी एकदम टकाटक व भरधाव न्यायचे. एक वळण पार करत असताना आमच्या ड्रायव्हर मामांनी गाडी थांबवली. आमच्या पुढे एक पांढऱ्या रंगाची मोठी बस थांबली होती. वळण व्यवस्थित घेता न आल्यामुळे गाडी कठडा ओलांडून थोडी पुढे गेली होती. आणखी थोडी पुढे गेली असतील तर काय झाल असत काय माहित? गाडीचे आणि गाडीतल्या मंडळींचे... कोणत्यातरी मुंबईकडील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ती सहल होती. मुलं-मुली, शिक्षक-शिक्षिका सर्वजन बस भोवती गोळा झाले होते. सर्वजण एकदम चिंताग्रस्त वाटत होते. बिचारा ड्रायव्हरची तर अवस्था फारच बिकट होती. झाल्या प्रकाराने तो खूपच धास्तावला होता. त्याने एकट्याने बस परत घेऊन वर काढण्याचा प्रयत्न केलेला पण  बस अधिक खाली जात होती. मुलांना धक्का  द्यायला सांगूनही त्याला बस वरती घ्यायला जमले नव्हते. आम्ही खाली उतरलो. ड्रायव्हर मामा पुढे त्यांच्या मागे आम्ही. आमच्या मागे आमच्या विभागाच्या कृषी-मैत्रिणी. आम्ही जवळ जाऊन विचारपूस केली.  त्यांचे शिक्षक-शिक्षिका, सर्व विद्यार्थी झालेल्या प्रकाराबद्दल सांगू लागले.
              आम्ही उतरल्यावर बरे झाले कोणीतरी मदतीला आलं, हा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. आमच्या बसचे ड्रायव्हर मामा त्या बसमध्ये चढले व बस सुरू केली. बस थोडी-थोडी खाली सरकत होती. रिवर्स गिअर असूनही मग मामांनी सर्व मुलांना पुढून मागे ढकलायला सांगितले. आमच्या आधी ही त्या मुलांनी तसा प्रयत्न केला होता पण ते यशस्वी झाले नव्हते. त्यामुळे आमच्या प्रयत्नाबद्दल त्यांचे बरेच शिक्षक संशयित नजरेने पाहत होते. आम्ही बस ढकलायला सुरुवात केली होती. आमच्या ड्रायव्हर मामांच्या प्रयत्नामुळे व आम्हा मुलांच्या धक्क्यामुळे अर्ध्याच्या वर बस वर आली. ते बघून उरलेली अभियांत्रिकी महाविद्यालयाची मूलही धक्का द्यायला आली आणि बघता-बघता बस रस्त्यावर आली.
            सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकांनी आणि मुलांनीही... आणि आमच्या विभागाच्या कृषी मैत्रिणींनीही... एक प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सार्यांनी आम्हाला धन्यवाद दिले आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. जर आम्ही त्यांना मदत नसती केली तर.... त्यांना क्रेन आणावी लागली असती. ती लांबून याला किती वेळ लागला असता? तोपर्यंत किती वेळ गेला असता? आमचा थोडा वेळ गेला पण त्यांच्या या वेळा पुढे काहीच नव्हता आणि बस रस्त्यावर आल्यावर वाजवलेल्या टाळयांमुळे  झालेल्या त्या आनंदापुढे ही काहीच नव्हता.  आमच्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींनी आमच्या विभागाच्या मुलींसमोर इतक्या आनंदाने टाळ्या वाजवाव्यात हीही एक मोठी आनंद देणारी गोष्ट होती. आमच्यातील काही जणांसाठी....
            आयुष्याच्या प्रवासात सहज जाता-जाता केलेली थोडीशी मदतही एखाद्याला खूप उपयोगी पडून जाते. एखाद्याचा मोठा त्रास, कष्ट  वाचवून जाते. आणि अशी मदत करण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी  येतेच. आपण ती संधी ओळखून नक्की जाता-जाता एखाद्याला थोडीशी तरी मदत करावी, तसा प्रयत्न तरी करावा.
              अशा छोट्याशा मदतीमुळे एखाद्याच्या आयुष्यात आपण थोडा जरी आनंद देऊ शकलो, थोडा जरी कष्ट, दुःख कमी अथवा नाहीसे करू शकलो तर या सारखी मोठी समाधानाची गोष्ट आपल्या आयुष्यात दुसरी कोणती असेल असं मला वाटत नाही आणि एकमेकांच्या  एकमेकाला केलेल्या सहकार्यामुळे एकमेकांच आयुष्य नक्कीच सुखमय होईल. मग आपलेही अन इतरांचेही.... जय हो.... मंगल हो...

पद्मकुमार आण्णासाहेब पाटील
Reg.No.K-10-123
Mob.No.-9028590717
Email- padmajay0123@gmail.com

रावेतील आठवण

दमी rawe साठी म्हौप्रे तालूका कऱ्हाड जिल्हा सातारा येथे होतो येथील खूप काही अविस्मरणीय आठवणी आहेत त्यातील एक एके दिवशी मी आणि माझा मित्र हेम...